सोलापूरच्या “सिद्धनाथ’साठी “गजलक्ष्मी’वर संकट

सोलापूर : सोलापूरच्या “सिध्दनाथ’साठी “गजलक्ष्मी’वर संकट आल्याचे सांगितले जात आहे. पंजाब नॅशनल बँकेने कर्ज थकल्याने प्रॉपर्टी जप्तीचा न्यायालयकडून आदेश घेतल्याने “मालका’ची चिंता वाढली असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
उत्तर सोलापुरातील “सिद्धनाथ’साठी पंजाब नॅशनल बँकेचे अंदाजे 30 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. हे कर्ज थकून रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या कर्जापोटी तारण असलेल्या प्रॉपर्टीचा ताबा घेण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात या बँकेने न्यायालयाकडून प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा आदेश मिळवला आहे. आहे. त्यामुळे या बँकेने हिरज, बेलाटी, तिर्हे, कोंडीसह अनेक ठिकाणच्या नॉन अॅग्रीकल्चर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यात सोलापुरातील “गजलक्ष्मी’चाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. बँकेने जप्तीची कारवाई करण्यासाठी वकिलांची मोठी फळी व न्यायालयाचे बेलीफ मदतीला घेतल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात बँकेने न्यायालयकडून जप्तीचा आदेश मिळवला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अक्कलकोटच्या “लक्ष्मी’नंतर आता सोलापूरच्या “सिद्धनाथ’वर आर्थिक संकट ओढविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे “मालक’ यातून काय मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडच्या काळात बँकांनी थकीत कर्जदारावर कारवाईची मोहीम त्रिव्र केल्याचे दिसून येत आहे. घरासाठी कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्यांचेही कंबरडे नवीन नियमामुळे मोडणार आहे. तुमचे घर,वाहन किंवा अन्य कर्जाचे हप्ते तीन पेक्षा जास्त थकल्यास खाते एनपीएमध्ये जाते. त्यानंतर कर्ज वसुलीसाठी बँका कोणत्याही पद्धतीचा वापर करताना दिसून येत आहेत. तारण कर्जासाठी थेट न्यायालयाकडून प्रॉपर्टी जप्तीचा आदेश घेतला जात आहे. त्यामुळे तुमचे कर्ज थकीत असेल तर आत्ताच सावध व्हा. अन्यथा बँकाचा फलक तुमच्या जागेवर किंवा मालमत्तेवर लागू शकतो.