February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नमिता थिटे

सोलापूर : पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवि वैद्य, प्रदेश संघटक माणिक निमसे, प्रदेश अध्यक्ष विकास सुसर यांच्या आदेशानुसार महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष विजया बावदाणे यांनी नमिता थिटे यांची पुनश्च एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
नमिता थिटे यांनी यापूर्वी महिला दिनानिमित्त पोलिस अधिकारी,महिला पदाधिकारी यांना “कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव केला होता. कोरोना काळात भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेते यांना सॅनिटर व मास्क वाटप केले होते.  संक्रांतीच्यावेळी वाण म्हणून मास्कचे वाटप केले होते. मोफत आरोग्य तपासणी, तसेच पोलीस कूटुंबियांसाठी व पत्रकार कुटुंबियांसाठी गौरी गणपती आरास स्पर्धा, गुणवंत पोलीस पाल्यांचा सत्कार, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रातील एकमेव रजिस्टर संस्था आहे. रवि वैद्य यांचे वडील पोलिस होते. त्यामुळे रवि यांनी पोलिसांची व त्यांच्या कुटुंबियांची समस्या जवळून पाहिली आहे. पोलीस कुटुंबियांसाठी काही तरी केले पाहिजे या तळमळीने 2011 साली पोलिस बॉईज असोसिएशनची रजिस्ट्रेशन करून स्थापना केली.2013 साली माजी गृहमंत्री स्व. आर. आर.पाटील. यांच्या माध्यमातून पोलिस पाल्यांसाठी पोलिस भरती मध्ये 5 टक्के आरक्षण मिळाले. पोलिस ट्रेनिंगमध्ये 1600 मीटर रनिंगमध्ये 50 सेकंद सर्वांसाठी वाढवून मिळाले.
पोलीस पाल्यांसाठी विविध खेळ, शिक्षण, वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन सुरूच आहे. पोलीसांचा पगार, त्यांची ड्युटीची वेळ, आरोग्य, न्याय व पोलीस भरतीमध्ये गुण वाढवून मिळावेत म्हणून व पोलीसांच्या हक्कासाठी कायम पोलिस बॉईज असोसिएशन कार्यरत आहे. थिटे यांचे पुनश्चन निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.