December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

जिल्हा परिषद पतसंस्था एकतर्फे रमजाननिमित्त लाभांश वाटप

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्र 1 सोलापूर यांच्यावतीने मुस्लीम समाजाचा रमजान सणासाठी सालाबादाप्रमाणे पतसंस्थेच्या मुस्लीम कर्मचारी सभासदाना सन 2024-25 मधील लांभाश रक्कमेचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्याहस्ते देण्यात आला.

पतसंस्थेचे मार्गदर्शक पंडित भोसले तसेच माजी चेअरमन कै. विवेकानंद लिंगराज यांनी सुरु केलेले कार्य पुढे अविरत सुरु ठेवणेकामी संपुर्ण संचालक मंडळ सदैव कटिबध्द असणार आहे असे पतसंस्थेचे शत्रुघ्नसिंह माने यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन सुरेश कुंभार, संचालक शहाजहान तांबोळी, तजमुल मुतवल्ली, शिवाजी राठोड, चेतन वाघमारे, श्रीधर कलशेट्टी, विष्णू पाटील, शिवानंद म्हमाणे, विजयसिंह घेरडे, विशाल घोगरे, गजानन मारडकर, किरण लालबोंद्रे, विकास शिंदे, मृणालिनी शिंदे, श्वेता राऊत, नितीन शिंदे, श्रीशैल देशमुख, सचिव दत्तात्रय देशपांडे तसेच संजय कुंभार, हुसेन नदाफ़, आदम, अल्ताफ़ पटेल, फ़रजाना शेख, सुरज नदाफ़ हे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.