सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख पुरस्कृत पॅनल आमने-सामने आल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी एन्ट्री मारत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व माजी आमदार दिलीप माने यांच्याशी जवळीक साधत पॅनलची उभारणी केली. यात आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत बुधवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यात 321 जणांनी उमेदवारी माघार घेतली तर आता बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
निवडणुकीत आमने-सामने आलेले पॅनलमधील उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय महाआघाडी पॅनल : सोसायटी विभाग, सर्वसाधारण : दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नारोळे, प्रथमेश पाटील, उदयकुमार पाटील, नागान्ना बनसोडे. सोसायटी, महिला : इंदुमती अलगोंड, अनिता विभुते. सोसायटी, ओबीसी: अविनाश मार्तंडे. सोसायटी, भटक्या जाती व जमाती: सुभाष पाटोळे. ग्रामपंचायत, सर्वसाधारण: गणेश वानकर, संगमेश बगले. ग्रामपंचायत, आर्थिक दुर्बल घटक: सुनील कळके. ग्रामपंचायत, अनुसूचित जाती- जमाती: रवींद्र रोकडे.
आमदार सुभाष देशमुख पुरस्कृत पॅनल… सोसायटी विभाग, सर्वसाधारण : चनगोंडा हवीनाळे, रमेश असबे, भीमाशंकर बबलेश्वर, आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील, धनेश अचलारे. सोसायटी, महिला: निलाबाई पुजारी, पुष्पा गुरव. सोसायटी, ओबीसी: सुभाष तेली. सोसायटी, भटक्या जाती- जमाती: संदीप टेळे. ग्रामपंचायत, सर्वसाधारण: मनीष देशमुख, रामाप्पा चिवडशेट्टी. ग्रामपंचायत, आर्थिक दुर्बल घटक: यतीन शहा. ग्रामपंचायत, अनुसूचित जाती- जमाती: अतुल गायकवाड.

More Stories
पहाटे तीन पर्यंत चालली बैठक तरी सकाळी झेडपीत राडाच रे बाबा
सोलापूर झेडपी सीईओवर पुन्हा अन्याय… तुम्हाला काय वाटते?
कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवीन सीईओ