February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शिक्षक सहकार संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी निलेश देशमुख यांची फेरनिवड

सोलापूर : शिक्षक सहकार संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी निलेश शशिकांत देशमुख यांची अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन, अकलूज येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत फेरनिवड करण्यात आली.

यावेळी राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्याहस्ते त्यांना राज्य सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष दिपक परचंडे,राज्य उपाध्यक्ष मनोज कोरडे, उमेश नायकुडे,राहुल मसुरे, मनोज बनकर, राज्य कोषाध्यक्ष रमेश आलापुरे, राज्य संघटक विठ्ठल टेळे, नवनाथ मेढे, सुवर्णा गाडे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी नुतन राज्य सरचिटणीस निलेश देशमुख म्हणाले की, मागील तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. शिक्षक सहकार संघटनेच्या प्रयत्नातून राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत २५ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. यापुढे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पुर्वीच्या जिल्ह्यात केलेली सेवा ग्राह्य धरावी याबाबत राज्यभर चळवळ उभी करणार आहे. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबविण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. सीबीएसई पद्धतीच्या गुणवत्तापूर्वक शिक्षण धोरणाचा अवलंब करताना शाळा व शिक्षकांवर लादलेला अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करून सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचे शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. शाळांमध्ये भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. शाळा आणि शिक्षकांवर लादलेला अशैक्षणिक कामांचा बोजा कमी केला पाहिजे. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची कालसुसंगत रचना करण्याची गरज आहे. शिक्षक, अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले. निलेश देशमुख यांची राज्य सरचिटणीसपदी फेरनिवड झाल्यानंतर त्यांचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा गाडे, पुणे विभागीय अध्यक्ष रविराज खडाखडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष रविंद्र जेटगी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पडदुणे, उपाध्यक्ष सुनील पवार, संभाजी शेलार, विलास कस्तुरे, कार्याध्यक्ष नेहरू राठोड, दिपक कांबळे, सुमंत मुंढे, आबासाहेब तरंगे, विशाल नाईक,विश्वनाथ राठोड, बजरंग कोळी, शिवाजीराव कदम, सचिन तवले, राहुल कांबळे, शिवाजीराव शिंदे, नागनाथ बळवंतराव, प्रकाश खुरंगुळे, सागर सोनवणे, संदिप धुमाळ यांनी अभिनंदन केले.