सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे या ॲक्शन मोडवर आल्या असून तक्रार असलेल्या कनिष्ठ सहायक शशिकांत ढेकळे यांना कार्यमुक्त करण्यात येणार असून तक्रार करणाऱ्या त्या वस्तीग्रहाच्या अधीक्षकाची ही चौकशी लावण्यात आली आहे.
दिव्यांग विभागाचा कारभार सांभाळणारे कनिष्ठ लिपिक ढेकळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.यावरून ढेकळे यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना समाज कल्याण आयुक्तांनी कळविले आहे.सोलापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभागाच्या कारभाराबाबत देवळालीच्या आमदारांनी दि.३ एप्रिल २०२४ रोजी समाज कल्याण आयुक्तांना निवेदन दिले आहे. संदर्भिय निवेदनाद्वारे आमदार सरोज अहिरे यांनी ढेकळे यांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. याची दखल घेत ढेकळे यांना कार्यमुक्त करणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी सांगितले. ढेकळे सध्या आजारी रजेवर गेले आहेत.
बीसी गर्ल्स हॉस्टेलच्या अधीक्षकेविरुद्ध गंभीर तक्रारी आहेत. पहारेकरी तीन महिने कामावर नसताना त्यांनी पगार काढला आहे. त्याचबरोबर इतर गंभीर तक्रारी त्यांच्याविरुद्ध आहेत. असे असताना त्यांनी वरिष्ठांकडे समाजकल्याण अधिकारी संस्था चालकाची बाजू घेत असल्याचा कांगावा केला आहे. त्यांच्या तक्रारीत तथ्य नाही. उलट त्यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी असून त्यांच्याविरुद्ध चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी स्पष्ट केले.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या