सोलापूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांच्या नूतनीकरणाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते तर हिरकणी कक्षाचे उदघाटन आमदार समाधान आवताडे यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री आले असता त्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला. प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत सिईओ कुलदीप जंगम यांनी केले. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व स्वराज्य गुढीचे पुजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. जिल्हा परिषदेत आल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते,- पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यानंतर सभागृहाची पाहणी करून केलेल्या कामांचे कौतुक केले. सिईओ कुलदीप जंगम यांचे दालन व व्हीसी रूमचीही त्यांनी पाहणी करून कौशल्यपुर्वक केलेल्या कामाचे कौतुक केले.
तत्कालीन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी या नूतनीकरण कामांचा आराखडा तयार करून ही कामे पुर्णत्वाकडे नेली. त्यांनतर सिईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांच्या टीमने यास मुर्त स्वरूप दिले. जिल्हा परिषदेचा कार्पेोरेट लुक पाहून पालकमंत्री गोरे भारावून गेले. प्रास्तविक भाषणात सिईओ कुलदीप जंगम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वाना बरोबर घेऊन राज्य कारभार केला. महाराजांनी केलेले काम आजही दिशादिर्शक आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आभार मानले. मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे यांनी पालकमंत्री यांना शिवचरित्र भेट देऊन गौरव केला.
राज्याभिषेकमुळे राजमान्यता: गोरे
छत्रपती शिवरायांनी अटकेपार झेंडा फडकविला. राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यानंतर राजमान्यता मिळावी यासाठी त्यांनी राज्याभिषेक केला, असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनिल जगताप, सचिन साळुंखे, अभियंता चेतन वाघमारे, महासंघाचे कार्याध्यक्ष दिनेश बनसोडे, सुर्यकांत मोहिते, संतोष जाधव, पतसंस्थेचे चेअरमन एस. पी. माने यांनी परिश्रम घेतले.
स्वानंद टिचर्स ग्रुपचा गौरव
स्वानंद टिचर्स ग्रुपने शिवभक्तीपर गिते सादर करून शिवराज्य दिनाच्या कार्यक्रमात उत्साह वाढविला. याप्रसंगी गायक व प्राथमिक शिक्षक महेश कोटीवाले, रूपेश क्षिरसागर, कुंभार यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते शिवचरित्र देऊन सन्मान केला.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की