सोलापूर : एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचा सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशाने आपण विधानसभा निवडणुकीच्यावेळी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला. आपणास जिल्हाध्यक्ष करण्यात आले असून अद्याप तसे पत्र आपल्याला देण्यात आलेले नाही. आज ना उद्या आपणास पत्र मिळेल. सध्या एमआयएम पक्षात आपण नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही, असे सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत काम करत आपण २२ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीपासून मुस्लिम समाज काँग्रेसपासून पूर्णपणे बाजूला गेला आहे. बाजूला गेलेला मुस्लिम समाज सध्या एमआयएमसोबत आहे. त्यामुळेच शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्षात मानसन्मान मिळत नाही, परंतु एमआयएम पक्षात मात्र मान आणि सन्मान मिळत आहे. काही अंशी नाराजी असली तरी आपण पक्षात राहूनच एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितले.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपणास किती नगरसेवक निवडून आणणार ? असे विचारल्यानंतर आपण २२ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे सर्वांसमक्ष सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष घालून कामाला सुरुवात करण्यासही सांगितले आहे.मात्र जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आपणास सोलापूर शहरातील राजकीय घडामोडीपासून वंचित ठेवण्यात येत आहे.त्यामुळे आपण कमालीचे नाराज झालो आहोत. आपणास अद्यापही जिल्हाध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले नसल्याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे. घरगुती अडचणीमुळे काही दिवस आपण एमआयएमपासून दूर जाणार आहोत. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे,मात्र नाराजीचा सूर कायम आहे.फारूख शाब्दी आणि आपण दोघे मिळून महापालिकेची उमेदवारी देण्याबरोबरच सर्वाधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे शौकत पठाण यांनी सांगितले.
पदाधिकारी निवडीचे काय झाले?
शौकत पठाण यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली होती पण अचानकपणे पत्रकार परिषदेत त्यांनी सूर बदलला. पठाण यांचे सोलापूर शहरात कार्य मोठे आहे. पण त्यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. तेथेही त्यांना व्यवस्थितपणे काम करू दिले जात नाही. जिल्ह्याची कार्यकारणी निवडीमध्ये हस्तक्षेप झाल्यामुळे त्यांनी अचानकपणे निर्णय बदलल्याचे सांगण्यात येत आहे. एमआयएमला सोलापूर शहरात एक चांगला पदाधिकारी मिळालेला असताना पठाण यांना नाव उमेद करण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे पठाण हे एमआयएम मध्येच राहतील की आगामी काळात पुन्हा दुसऱ्या पक्षाची वाट धरतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की