सोलापूर शहर पोलीसक्राईम

बापरे… जुळे सोलापुरात चड्डी गॅंगने घर फोडले

सोलापूर : सोलापुरात गेल्या आठवड्यात चर्चेच्या ठरलेल्या चड्डी गँगने जुळे सोलापुरातील बंद घर फोडल्याचे उघडकीला आले आहे.

जुळे सोलापुरातील वास्तुविहार कॉलनीतील एका सीसीटीव्हीमध्ये चड्डी गॅंगच्या हालचाली पुन्हा टिपल्या गेल्या आहेत. जुळे सोलापुरात मजरेवाडी परिसरात गिरीजा मंगल कार्यालय शेजारी वास्तुविहार कॉलनी आहे. दोन दिवसापूर्वी या कॉलनीत चड्डी गॅंगने मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास प्रवेश केला. या कॉलनीतील मराठे यांचे बंद घर फोडून आतील चांदीचे दागिने या गँगने चोरून नेले असल्याचे कॉलनीतील लोकांनी सांगितलं. मराठे हे घर बंद करून बाहेर गेले होते. घराचे कुलूप तोडून या गॅंगने ही चोरी केली. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डिलिव्हरी बॉय मराठे यांचे पार्सल घेऊन घरी आला. घर बंद असल्याने त्याने मराठे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. त्यावेळी मराठी यांनी त्याला पार्सल घराच्या दरवाजासमोर ठेवण्यास सांगितले. डिलिव्हरी बॉय फाटक उघडून दरवाज्याजवळ पार्सल ठेवण्यासाठी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. त्याने दरवाजा उघडा आहे असे सांगितल्यावर मराठे यांना आश्चर्यचा धक्का बसला. घराचे कुलूप तोडण्यात आले आहे, असे तपासणीवरून लक्षात आले. त्यावर मराठे हे तात्काळ आपल्या घराकडे आले. चोरीबाबत माहिती दिल्यावर विजापूरनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कॉलनीत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोरट्यांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

पेहरावात दिसला फरक…

जुना पुणे नाका परिसरामध्ये दिसलेली चड्डी गॅंग काळया कपड्यांमध्ये दिसत असून सर्वजण तरुण दिसत आहेत. तर जुळे सोलापुरात आढळलेल्या फुटेजमध्ये चारही चोर पांढऱ्या शुभ्र पेराव्यात असून वयस्कर दिसत आहेत. दोन्ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या वाटत असून अशा दोन गॅंग कार्यरत असाव्यात अशी चर्चा आहे.

चड्डी गॅंगचा दुसरा फुटेज…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button