May 6, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी मिशन अनुकंपा भरती; सीईओ जंगम यांच्यावर संघटना जाम खुश

सोलापूर : अनेक दिवसापासुन प्रतिक्षेत असलेली अनुकंपा भरतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पारदर्शकपणे मोहीम राबवत 124 उमेदवारांना जिल्हा परिषदेमध्ये भरती करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती पत्र दिले. यामुळे अनुकंपाधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून झेडपी कर्मचारी संघटनांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व अनुकंपाधारकांच्या कुटुंबीयांनी सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरुण  क्षिरसागर यांनी अनुकंपा भरती तात्काळ करावी म्हणुन पाठपुरावा केला होता. त्यावेळी अनुकंपा तात्काळ करणेत येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांना नियुक्ती पत्र दिल्याबदृदल संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा पुष्पगुच्छ देवुन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे,उपाध्यक्ष उमाकांत राजगुरु, सचिव रामदास गुरव, संतोष जाधव, नागनाथ धोत्रे, चेतन भोसले, योगेश कटकधोंड, देविदास म्हेत्रे आदिसह संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, वरीष्ठ सहाय्यक महेश केंद्रे, कनिष्ठ सहाय्यक शिवाजी राठोड, मोहित वाघमारे यांनी अत्यंत पारदर्शक प्रक्रिया राबवून 124 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वाखाली जिल्हा परिषदेच्या सेवेत नियुक्ती दिली. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने सर्वांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी महासंघाचे दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, सचिन सोनकांबळे, प्रदीप सकट, सचिन मायनाळ, सुरेश राठोड, अनुपमा पडवळे, राजश्री कांगरे, हेमलता बनसोडे, संतोष शिंदे, सचिन गुरव, संजय गौडगाव, आकाश बडवे, प्रसाद देवळे , कानीफनात चव्हाण, नीलेश कुलकर्णी, वाले, आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर अत्यंत पारदर्शकपणे अनुकंपा भरती करून इतिहास निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांना 124 कुटुंबाचे आशीर्वाद लाभले आहेत, अशी प्रतिक्रिया महासंघाच अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी दिली.

  • आषाढीवारीनंतर अनुकंपा भरती मिशन पारदर्शकपणे, रेकॉर्डब्रेक केल्याबद्दल जिल्हा परिषद पत्रकार संघातर्फे सीईओ संगम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, राजकुमार सारोळे, दीपक शेळके, हरिश्चंद्र कदम उपस्थित होते.