सोलापूर : माळशिरस तालुक्यातील महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचेतन घोडके यांची जिल्हा बाहेर प्रशासकीय बदली करावी, अशी शिफारस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवाकडे केली आहे.
महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचेतन घोडके यांच्याविरुद्ध अशा स्वयंसेविका रुग्णालयातील कर्मचारी व स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत. डॉक्टर घोडके कर्मचारी व नागरिकांना विनाकारण अपमानास्पद वागणूक देणे मानसिक त्रास देणे रुग्णालयातील सेवा सुरळीतपणे न देणे अशा प्रकारे मनमानी कारभार केल्याच्या या तक्रारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर नव्याने दाखल झालेल्या महिला डॉक्टरांनाही जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवला होता. यावरून डॉक्टर घोडके यांच्या कार्यपद्धतीबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावरून चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या प्रकरणाचे सुनावणी घेतले. डॉक्टर घोडके यांच्याविरुद्धच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे दिसून आल्यामुळे व त्यांच्या वर्तणुकीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाल्यामुळे त्यांना जिल्हा बाहेर इतरत्र प्रशासकीय बदले करावे अशी विनंती सीईओ जंगम यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवाकडे केली आहे. आपल्या विचित्र वागणुकीतून सर्वांना डोईजड ठरलेल्या या डॉक्टराला जिल्हा बाहेरचा रस्ता दाखवण्याची शिफारस करण्यात आल्यामुळे आशा वर्कर व नर्सेस यांनी समाधान व्यक्त केले आहे. सीईओंच्या अहवालावरून सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ. घोडके यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे मागणी नववानिर्मित नर्सेस संघटनेने केली आहे.

More Stories
Ai watch: जनावरांच्या डॉक्टरांनी वाढवली जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी
विनायक कोंड्याल होणार सोलापूरचे महापौर
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश