March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मनात जिद्द ठेवली तर यश निश्चित ; काव्या देशमुख हिचे घोलप यांनी केले कौतुक

सोलापूर: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. मनात जिद्द ठेवली तर यश निश्चित मिळते असे आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी काव्या देशमुख हिच्या सत्कारप्रसंगी सांगितले.

कुर्डूवाडी येथे मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांची मुलगी काव्या देशमुख हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक व सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच तिची शासकीय सैनिक स्कूल मध्ये व नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याबद्दल तिचा झारखंड राज्याच्या जल जीवन मिशन व पेयजल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव, आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी काव्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी विद्यार्थ्यांनी योग्यवेळी ध्येय निश्चित करून त्या ध्येय प्राप्तीसाठी जीवापाड मेहनत घेतली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे सांगत आपल्या जीवनातील टर्निंग पॉईंट सांगितले. परिस्थिती कशीही असो तुम्ही जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर तुम्ही ती करू शकता त्यामुळे परिस्थितीपुढे कधीही हार मानू नका, संघर्ष करा व यशस्वी व्हा असे शेवटी घोलप यांनी सांगितले. यावेळी कुर्डूवाडी रेल्वे इन्स्टिट्यूटच्या खजिनदारपदी प्रविण सोमासे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा रमेश घोलप यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, कुर्डूवाडी रेल्वे इन्स्टिट्यूटचे खजिनदार प्रविण सोमासे, अकुंश गवळी, सिद्धेश्वर परबत, नागेश व्यवहारे उपस्थित होते.