March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अभिमानास्पद …सोलापुरात कंपाउंडरची मुलगी झाली डॉक्टर

सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिकलेली विध्यार्थीनी डॉ. गायत्री महारुद्र कत्ते हिने बी.एच.एम.एस.च्या अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणी गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

गायत्री हिचे वडील महारुद्र कत्ते हे डॉ. किरण पाटील यांच्याकडे गेल्या 35 वर्षांपासून कंपाउंडर म्हणून सेवा देत आहेत तर गायत्रीची आई एका खेडेगावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे.  गायत्री हिने दक्षिण सोलापूर आतील वांगीया एका खेडेगावामधून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैदयकीय शिक्षण घेत आपले नांव केले आहे. हरीभाई प्रशालेतून कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने महिला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे . त्यासाठी तिला संस्थापक विलास हरपाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

तिच्या या यशाबद्दल हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक, उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, डॉ. किरण पाटील, डॉ. सुनिता पाटील, माजी प्राचार्या स्मिता क्षीरसागर, प्रकाश भोईटे, निलेश पाटील, प्रा. सिद्धेश्वर उकळे, सतीश काळे, प्रा. भानुदास बनसोडे, ए.पी.आय.आदिनाथ पाटील, औदुंबर सर्वगोड यांचे सहकार्य लाभले.