सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. या आरक्षणानुसार सोलापूर जिल्हा परिषदेत मोहिते– पाटील घराण्याचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. माळशिरस तालुक्यातील आरक्षित झालेले गट पाहता मोहिते_ पाटील यांचा एकही सदस्य जिल्हा परिषदेत एन्ट्री मारणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. बदलत्या राजकारणांनुसार इतर तालुक्यात त्यांना संधी मिळणे ही कठीण दिसत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेवर बराच काळ मोहिते– पाटील घराण्याचे प्राबल्य राहिले आहे. तीन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये मोहिते– पाटील घराण्यातील दोन सदस्य प्रतिनिधित्व करीत होते. माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पुढाकाराने ते अर्धा टर्म जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत आली. त्यानंतर संजयमामा शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवली. या काळात राज्यभरात वेगळे राजकारण होते. आमदार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांच्या गटाची पोट निवडणूक झालीच नाही. त्यानंतर मोहिते_ पाटील गटाचे कांबळे अध्यक्ष झाले. पण यानंतरचा कार्यकाल कोरोना महामारीतच गेला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण पुन्हा बदलले. गेले तीन वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मोहिते– पाटील गट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे जिल्ह्यात मोठे उलथापालथ झाली. पण सत्य भाजप मित्र पक्षाचे सरकार आल्यामुळे मोहिते– पाटील गटाची गोची कायम राहिली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गटाचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्व गट आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मोहिते– पाटील घराण्यातील सदस्याला तालुक्यात संधी मिळणार नाही. असे पहिल्यांदाच घडले आहे.
नुकत्याच संपलेल्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा परिषदेत बोरगाव गटातून निवडून आलेल्या स्वरूपाराणी जयसिंह मोहिते– पाटील, अकलूज गटातून निवडून आलेल्या शितलदेवी धैर्यशील मोहिते– पाटील या दोन सदस्य सभागृहात होत्या. त्याचबरोबर महाळुंग, वेळापूर, दहिगाव, यशवंतनगर या गटात मोहिते– पाटील गटाचे सदस्य निवडून आले होते. आता महाळुंग व यशवंतनगर नगरपंचायत झाल्याने अरुण तोडकर व सुनंदा फुले यांचे जिल्हा परिषदेतील राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे. मंगल वाघमोडे यांचा मतदारसंघ मात्र शाबूत राहिला आहे. माळशिरस तालुक्यातील सर्वच मतदारसंघावर आरक्षण पडल्यामुळे मोहिते पाटील घराण्यातील सदस्यांना जिल्हा परिषदेत एन्ट्री मारण्यासाठी संधी राहिलेली नाही. इतर तालुक्यातून त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. पण सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता ही मोठी रिस्क असल्याचे मानले जात आहे. माळशिरस मध्ये विधानसभा निवडणुकी वेळेस मोहिते पाटील गटाने केलेली खेळणी आता योगायोगाने त्यांच्याच अडचणीची ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्चस्वाला भाजपच्या विजयाची नांदी येथूनच सुरू झाल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
असा आहे इतिहास…
जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचे मोठे वर्चस्व राहिले आहे. मोहिते– पाटील यांनी करमाळ्यातील नामदेवराव जगताप यांना बोरगाव मतदार संघात उभे करून बिनविरोध निवडून आणले होते. इतकेच नव्हे तर झेडपीच्या अध्यक्षपदावरही त्यांना संधी दिली होती . त्याचबरोबर त्यांच्या गटाचे रावसाहेब पाटील यांना लोकल बोर्डाचे अध्यक्षही केले होते. महाळुंग गटातून मदनसिंह मोहिते– पाटील अरुणा जाधव, रामहरी नवगिरे, सुहास रेडे–पाटील ,कुंडलिक पाटील आणि शेवटी अरुण तोडकर यांना निवडून आणण्यात मोहिते– पाटील यांना यश आले होते. पण या वेळेस त्यांना मतदार संघ शोधावा लागणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात बळीराम साठे इच्छुक होते पण त्यांनाही मतदारसंघ राहिला नाही. अक्कलकोटमध्ये माझी पक्षनेता आनंद तानवडे, दक्षिणमध्ये अण्णाराव बाराचारे यांचा मतदारसंघ शाबूत राहिला आहे. सुरेश हसापुरे यांनाही मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. कोंडी मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने एन्ट्री मारणार अशी चर्चा आहे. माजी सदस्य उमेश पाटील यांचा अनगर, विजयराज डोंगरे यांचा मतदारसंघ शाबूत राहिला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असल्याने निवडून येऊन कोण अध्यक्ष होणार? याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
असे आहे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण..




More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ