सोलापूरजिल्हा परिषदशिक्षणसंघटना-संस्था

सोलापूर झेडपीचे सेवानिवृत्त शिक्षक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

सोलापूर : निसर्गातील प्रत्येक चरा चरामध्ये ईश्वराचा अंश असतो. याची जाणीव ठेवून जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पशुधन बचाव मोहीमेअंतर्गत पूरग्रस्त मुक्या जनावरांना पशुखाद्य वाटपाचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरवोद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्यांवतीने पशुखाद्य वाटप करण्याच्या कार्यक्रमात काढले

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने शिवानंद भरले यांच्या कल्पनेतून सुचलेल्या पशुधन बचाव मोहीमअंतर्गत सिना नदीच्या महापुराने बाधीत झालेल्या गावातील मुक्या जनावरांना पशुखाद्य देण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांनी  २,६०,००० हजाराचा निधी जमा केला. त्यातून ७ टन पशुखाद्य खरेदी केले. त्याचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात १० शेतकर्याना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, पशुधन अधीकारी विशाल येवले उपस्थित होते

पूरग्रस्तांना पाहिजे तेवढे अन्नधान्य पुरवठा होत आहे. परंतु पशुधनाचे वैरण पाण्याखाली गेल्याने मुखी जनावरे गोठ्यावर उपाशीपोटी राहत असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम स्तुत्य आहे, असे सीईओ जंगम म्हणाले. यासाठी सुभाष फुलारी, सिध्देश्वर धराडे, रमेश गायकवाड, शंकरराव सावंत, कुंदा राजगुरू, काळप्पा सुतार, मल्लिकार्जुन बडदाळ, सिद्राम जिरगे, चन्नमलप्पा चिट्टे, भिमाशंकर म्हेत्रे, बादशहा मुल्ला, शिवाजी पाटील, वीरभद्र यादवाड, संजय देवकाते, किर्ती गुरव, वसंत दिघे, विलास गिराम, बशीर ताबोंळी, सुरेश गुरव, शब्बीर अन्सारी,दिनकर घोडके, शंकरराव जाधव, नितीन कुलकर्णी, भरतेश्वर रत्नपारखी, सिद्राम शेगाव, पुजारी काळे, आदींनी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकाच्यां मदतीने हा उपक्रम राबविला.

पूरग्रस्तबाधीत गावातील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष  शिवानंद भरले, जिल्हा अध्यक्ष सुभाष फुलारी, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजी पाटील, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष काळप्पा सुतार, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सिद्राम शेगाव, तालुका शिक्षक सोसायटीचे चेअरमन दयानंद वठारे, शिक्षक संघाचे राज्य सदस्य रेवनसिध्द हत्तीरोग आदींनी हे पशुखाद्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाटप केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button