सीना नदीकाठचा वीजपुरवठा दहा दिवसात सुरळीत होणार

सीना नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांबरोबर बैठक. या बैठकीत वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

Rajkumar Sarole
1 Min Read

सोलापूर : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरामुळे अनेक गावांतील वीजवाहिन्या, पोल, ट्रान्सफॉर्मर यांची दुरावस्था झाल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मागील एका महिन्यापासून प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधींसह महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता (SE) सुनील माने यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर आणि पोल संदर्भातील अडचणींविषयी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत अभियंता माने यांनी येणाऱ्या दहा दिवसांत सर्वतोपरी प्रयत्न करून सीना नदीकाठच्या सर्व प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याचे, आवश्यक ते पोल आणि ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डॉ. चनगोंडा हाविनाळे, संदीप टेळे,अतुल गायकवाड, राम जाधव, विशाल जाधव तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *