May 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर

सोलापूर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु. मार्च २०२६ परीक्षेचा निकाल दिनांक २ मे रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी दिलेल्या वेळापत्रक प्रमाणे ऑनलाईन कार्यवाही करावी असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै २०२६ परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १२वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे

विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे रक्कम भरावयाची तारीख उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख नियमित शुल्क मंगळवार, दिनांक ०५/०५/२०२६ ते शुकवार, दिनांक १५/०५/२०२६ पर्यंत तर गुरूवार दि.२१/०५/२०२६ पर्यंत ते सोमवार दि.२५/०५/२०२६

विलंब शुल्क शनिवार, दिनांक १६/०५/२०२६ ते बुधवार, दिनांक २०/०५/२०२६पर्यंत. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फेब्रु मार्च २०२६ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु. मार्च २०२६ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६, फेब्रु. मार्च २०२७ व जून- जुलै २०२७ अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाच्या अधिकृत Website द्वारे प्राप्त Online चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून NEFT/ RTGS द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/Axis Bank च्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. ५ उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अति विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील, राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी कळविले आहे.