सोलापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते काका तथा बळीराम साठे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू झाली आहे. या भेटीबद्दल विचारले असता, काय करू बाबा झेडपी निवडणूक लढवायची असेल तर “घड्याळ’ हवेच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणणाऱ्या काका साठे यांनी शरद पवार गटाची साथ सोडली. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पद असतानाही त्यांना न विचारताच निर्णय होऊ लागल्याने त्यांनी या गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. आता राजकारण नको म्हणणाऱ्या काकांनी झेडपीची निवडणूक जाहीर झाल्यावर शेवटची लढाई म्हणून पुन्हा एकदा चाचपणी सुरू केली आहे. वडाळा मतदारसंघ आरक्षित झाल्याने बीबीदारफळ जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी बैठका घेतल्यानंतर या मतदारसंघातील लोकांनी काकांना स्पष्टच विचारले. काका तुम्ही येथून निवडणूक लढविता ते ठीक आहे पण तुमचा पक्ष कोणता? विशेषता शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारल्याने काका अंतर्मुख झाले आहेत. आता त्यांना काय उत्तर द्यावे याबाबत विचार करून मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्याच्या निमित्ताने त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. लग्नाच्या निमंत्रणाबरोबरच राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असेल तर पक्ष हवाच. त्यामुळे आता अजित दादाकडून “घड्याळ’ हातात बांधणार असल्याचे ते म्हणाले. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कधी होणार? याबाबत विचारल्यावर तारीख अजून फिक्स नसल्याचे त्यांनी सांगितले.

More Stories
सीईओ कुलदीप जंगम यांचा दणका; नागेश पाटील यांची स्थानांतरण बदली
सोलापूर झेडपीत नवा पायंडा; तदर्थ पदोन्नतीद्वारे मर्जीतील कर्मचाऱ्यांना स्थान
मंद्रूप पोलीस ठाण्यात तहानलेल्या पक्षांसाठी सुरू केली पाणपोई