सोलापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभा केलेला रूक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृह हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सोलापुर शहरातील पार्क चौक येथे रुक्मिणी मॉल व उपहारगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील पॅकेजिंग, लेबलिंग उत्तम असलेल्या 100 नाविन्यपूर्ण उत्पादने विक्रीकरिता ठेवण्यात आली आहेत. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला मार्केटिंग उपलब्ध होणार असून यापुढे उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरासाठी सरकारच्यावतीने पुढाकार घेतला जाणार आहे.
उदघाटन कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रूक्मिणी शॉपिंग मॉल व उपहारगृहाची संकल्पना सांगून उमेद मार्फत जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमाची माहिती सांगण्यात आली.तसेच सदर मॉल चालविण्यात देण्यात आलेल्या शुभदा बचत गटाला शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने लेखापाल शीतल म्हता, तालुका अभियान व्यवस्थापक शैला केशवदास, अवधूत देशमुख, शिवाजी वाघमारे, आण्णा आवताडे, गणेश पाटील,पूनम दुध्याळ, सुषमा बिचकुले, उमेश डांगे, सर्व तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
More Stories
आयएएस कुलदीप जंगम यांची मुत्सद्देगिरी; आंदोलनाचे 21 दिवस संयमाने हाताळले
मराठा सेवा संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी निलेश देशमुख
मंद्रूपच्या अस्वच्छतेबाबत झेडपी सीईओ जंगम यांची नाराजी