December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे असेही कामकाज

सोलापूर : सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क प्रवासात वेळेचा सदुपयोग करीत फायली तपासून 31 शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावला आहे.

सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी गेल्या आठवड्यात वीस वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकाची विनाअनुदानितवरून अनुदानित शाळेकडे बदलीचा प्रस्ताव मंजूर करून त्याच्या सासर्‍याला धक्का दिला होता. शिक्षण विभागात याची चर्चा सुरू असतानाच मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पेन्शनरांचा आनंद वाढवला आहे. वेतन विभागाकडून 31 सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शनचे प्रस्ताव  मंजुरीसाठी आले होते. पण कार्यालयातील कामकाजामुळे या फाईलीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. सेवानिवृत्त न पेन्शन तातडीने मिळावे म्हणून त्यांनी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर या फायली सोबत घेतल्या. मंगळवारी पुण्यातील उपसंचालक कार्यालयात सुनावणी असल्यामुळे त्यांचा प्रवास सुरू झाला. या प्रवासातच त्यांनी या पेन्शनच्या फायली हातावेगळ्या केल्या. प्रवासातच फायली तपासून त्यांनी त्यावर मंजुरीचे आदेश दिले. त्यामुळे वेतन विभागाचे काम हलके झाले. 31 सेवानिवृत्ती शिक्षकांना वेळेत पेन्शन मंजूर होण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रवासातील वेळेत कामकाज करीत  पेन्शनरांचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.