December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपी पतसंस्था निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजय 

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक 2 मर्यादित, सोलापूर या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने विरोधकांना संधी देऊनही, त्यांनी पतसंस्थेचा हित न जोपासता आपल्या हट्टापोटी निवडणुकीला उभे राहिले. त्या सर्व उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. तसेच विरोधकांना पोलिंग एजंटसुद्धा मिळाले नाहीत अशी दयनीय अवस्था झाली होती.

या निवडणुकीत पुढील उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वसाधारण मतदारसंघ गिरीश जाधव, सुधाकर माने देशमुख, श्रीकांत धोत्रे, श्रीकृष्ण घंटे, शशिकांत साळुंखे, यादव मोहन, अंकुश कोळेकर, दिनेश बनसोडे,समीर शेख, भीमाशंकर वाले.भटक्या विमुक्त मतदार संघातून रणजीत घोडके, ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे, महिला मतदारसंघातून राणी सुतार, संगीता हंडे, बिनविरोध प्रदीप सकट. असे एकूण 15 उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. या पॅनलचे उमेदवार निवडून आणण्यासाठी  राजेंद्र माशाळ, रामस्वामी मनलोर, सिद्धाराम बोरुटे, अविनाश गोडसे, रवी कोरे, पॅनल प्रमुख महेश जाधव, रणजीत घोडके प्रचार प्रमुख गिरीश जाधव, शिवाजी कांबळे यांनी प्रयत्न केले. विरोधातील सर्व उमेदवार पराभूत झाले.