सोलापूरजिल्हा परिषद

रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रशासनाने जयदत्त तयारी केली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रेड कार्पेट रेडी ठेवले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हॉटेल बालाजी सरोवर येथे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य एकत्र जमले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता अध्यक्ष निवडीची सभा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत अर्ज देणे व घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अर्ज देण्याची वेळ सुरू झालेली असताना पहिल्या दहा मिनिटात कोणीही अर्ज घेण्यास आलेले नाही. दरम्यान पदाधिकारी निवडीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जयत तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी तयारीचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button