सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

ऑनलाइन कार्यप्रणालीत सोलापूर माध्यमिक शिक्षण अव्वल

सोलापूर : ऑनलाइन कार्यप्रणालीत सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे काम राज्यभरात अव्वल ठरले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचा कारभार ऑनलाईन झाला आहे. इ फायलिंग सिस्टीमवर सर्वच विभागाने काम करावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या आहेत. त्यानुसार दरमहा कोणता विभाग किती इ फायलिंग अपलोड करतो याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनीही शिक्षण विभागाचा कारभार ऑनलाईन करावा अशा सूचना दिल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी याबाबत वारंवार आढावा घेतला आहे. शिक्षण आयुक्तांच्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार ऑनलाईन केला आहे. त्यामध्ये सर्व पत्रे, प्रस्ताव ऑनलाइन स्वीकारली जात आहेत. यावर स्वतः शिक्षणाधिकारी जगताप हे संगणक व लॅपटॉपद्वारे ऑनलाईन कामकाज करीत आहेत. मागील आठवड्यात शिक्षणाधिकारी जगताप यांनी 2795 ई-फायलिंग वर कामकाज केले आहे. ऑनलाइन कामकाजाची सोलापूर माध्यमिकचे ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. याबद्दल शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंह, शिक्षण उपसंचालक मोरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. माध्यमिक शिक्षण विभाग नियमित चर्चेत असतो. शिक्षक व शाळांचे संस्थापक यामध्ये मोठे वाद असतात. शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या तक्रारी व याबाबत लावलेल्या सुनावण्यांना हजेरी लावण्यात मोठा वेळ जातो. यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर खंडपीठ या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांना जावे लागते. गेल्या आठवड्यात त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात 17 सुनावण्यांना हजेरी लावली. पहाटे सोलापुरात येऊन पुन्हा सकाळी माध्यमिक कार्यालयात सुनावण्या घेतल्या. याशिवाय दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडणेविषयी कामकाज केले.

ऑनलाइन कामकाज प्रणालीत अद्याप वैद्यकीय बिलांचा विषय आलेला नाही. या बिलांचा निपटारा गृहीत धरला तर हे काम आणखी मोठे होणार आहे. शिक्षकांच्या तक्रारी व चुका टाळण्यासाठी ई-फायलिंगचा पर्याय उत्तम ठरला आहे. यावर अपलोड केलेल्या फायलींचे रेकॉर्ड बदलता येत नाही. याशिवाय कोणत्या फायली कधी अपलोड केल्या याची माहिती मिळते. वादातील पर्यायात हा चांगला पुरावा ठरत आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे कामकाजात गती व पारदर्शकता राहत असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button