सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत 5000 विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे.
शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीची जबाबदारी माध्यमिक शिक्षण विभागावर देण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने शहरातील 5000 विद्यार्थ्यांची रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध शाळा व कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. चार हुतात्म्यांना अभिवादन करून ही रॅली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डफरीन चौकमार्गे रंगभवन चौकातील शिवछत्रपती उद्यानापर्यंत येणार आहे. शिवछत्रपती उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून पाळणा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात व्याख्यान होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याबरोबर सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

More Stories
सोलापुरात रेल्वेसमोर उडी मारून मायलेकीची आत्महत्या
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत