सोलापूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सर्व ग्रामीण प्रकल्पमध्ये 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जात असून त्याचा समारोप प्रतिष्ठा मंगल कार्यालय, टेंभूर्णी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अधक्षतेखाली करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती कु अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे, अश्विनी दळवी, वंदना कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पंचायत समिती कुर्डुवाडी उपसभापती स्वाती गिडडे, पंचायत समिती सदस्या प्रतिभा खरात, प्राजक्ता पाटील, छाया करंडे, अमृता पाटील, पंचायत समिती सदस्य तात्या अनपट, सचिन पाटील, दिगंबर माळी, ग्रा प सदस्य नागनाथ वाघे , सरपंच हनुमंत गिडडे, संदीप पाटील, करंडे व जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी, विशाल भोसले, समाधान नागणे, अभिजीत मोलाणे, राहूल चव्हाण, सुवर्णा जाधव, योगिता वैराट, बालाजी आल्लडवाड उपस्थित होते.
कार्यक्रमांची सुरुवात दिपप्रज्वलनाने केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महिला बालकल्याण सभापती कु अमृता वाघे तसेच इतर सर्व मान्यवरांनी अंगणवाडी सेविकांनी भरविलेल्या पौष्टिक पाककृती प्रदर्शनास भेट देऊन पाककृतींचा आस्वाद घेतला. यावेळी शेवग्याच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पाककृती तसेच नाचणी,बीट, सोयाबीन, शासनाचा THR पासून जवळपास 100 प्रकारच्या पाककृतीचे प्रदर्शन पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व महिला बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविकाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा कार्यकम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दि. 9 ते 23 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडामध्ये साजरे केलेले कार्यक्रमाबाबत उपस्थिताना अवगत केले. आठवा राष्ट्रीय पोषण पंधरवडा हा बालकाच्या जीवनातील पहिल्या सहा वर्षातील मेंदूचा विकास या संकल्पनेवर आधारित असून त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व अंगणवाडी केद्रांमध्ये सुरु असणाऱ्या कार्यक्रमांबाबत सर्व मान्यवरांना अवगत केले. सध्याच्या काळात बालकांना मोबाईलचे व्यसन लागले असून स्क्रीनच्या अतिवापराचे दुष्परिणाबाबत व त्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत देखील अंगणवाडी सेविकांनी पालकांना अवगत करणेबाबत प्रसाद मिरकले यांनी मार्गदर्शन केले.
बालकाच्या वयाच्या 5 वर्षा पर्यंत मेंदूचा विकास 60% होत असलेने या काळात जर बालकांना मोबाईलचे व्यसन लागू नये यासाठी आरंभ – विकास बालकांचा व आकार अभ्यासक्रमाचा वापर करून बालकांचा स्क्रीन टाइम कमी करणेबाबत पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी प्रसाद मिरकले यांनी केले.
याप्रसंगी महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविका या कोणत्याही योजनेच्या गावात दूत म्हणून काम करीत असून त्यांचे काम खरोखरच चांगले असलेचे व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागामध्ये पोषणबाबत जागरूकता वाढविणे व कुपोषण कमी करणेबाबत वरचेवर असे जास्तीत जास्त उपक्रमांचे आयोजन करणेबाबत सूचना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैदय यांनी यावेळेस बाळांचे पहिले 1000 दिवसांचे महत्व विषद केले तसेच मिशन वात्सल्यअंतर्गत एकल महिलांचा सर्वे सुरु असून अशा एकल महिलांना शासनाच्या आवश्यक असणाऱ्या योजनेचा लाभ देण्याबाबत सेविकांना आवाहन केले.
कार्यक्रमावेळी अंगणवाडी बालकांना विदयारंभ प्रमाणपत्रे, मातांना बेबी केयर किट, पूर्व शालेय किट, आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी योजनाचे साहित्य तसेच प्रमाण पत्रांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.कार्यक्रमामध्ये किशोरी व महिलांची HB तपासणीबाबत कँप आयोजित करुन आरोग्य विभागाकडील आशा वर्कर व आरोग्य सेविकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे यांनी मुलांनी रिल्स पाहू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समिती माढा उपसभापती स्वाती गिडडे , पंचायत समिती सदस्या करंडे, पाटील, जि प सदस्या दळवी, कांबळे व संदीप पाटील कुर्डु यांनी देखील 1000 दिवस बाळाचे , मातांनी घ्यावयाची काळजी तसेच अंगणवाडी सेविकांचे समाजातील योगदान या विषयांवर उपस्थित अंगणवाडी कर्मचारी व महिलांना मार्गदर्शन केले व सर्व अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाचे कौतुक केले.
बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांनी आभार तर सुत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेसाठी विस्तार अधिकारी आकाश कोकाटे, अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुराधा मिस्कीन, लता पाटील, खटके, मगर, बारबाले, पवार, शिंदे, लोखंडे व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेवून नियोजन केले.

More Stories
शाळेला लागल्या सुट्ट्या अन् कलेक्टर ऑफिसने घेतली खबरदारी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन फ्लॅटचा शोध लागला पण पुढे काय?
दहावी, बारावीला असलेल्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या…