April 25, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

डीएचओ म्हणून सतीश कोपुरवाड यांनी घेतला पदभार आणि लगेच लागले मोठे काम

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी शुक्रवारी मावळते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडून पदभार घेतला. पदभार घेतल्यानंतर सीईओ कुशल जैन यांनी त्यांचे स्वागत केले व आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात पिछाडीवर असल्याने येत्या आठ दिवसात 20 हजार कार्ड वाटपाचे टारगेट पार करण्याची जबाबदारी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांची नांदेडचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्याजागी नांदेडचेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. कोपरवाड यांनी उशिराने शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेला हजेरी लावली. मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांच्याशी भेट घेऊन त्यांनी पदभार घेतला. पदभार घेतल्याबरोबरच सीईओ जैन यांनी त्यांना बोलावून घेऊन आयुष्यमान कार्ड वाटपात सोलापूर जिल्हा राज्यात पिछाडीवर आहे. सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्याची अशी पीछेहाट बरोबर नाही. सर्व कामात सोलापूर जिल्हा परिषद अव्वल असली पाहिजे. आयुष्मान कार्ड योजना आहे गोरगरिबांसाठी आहे. त्यामुळे या योजनेचे कार्ड घरोघरी पोहोचले पाहिजे. आठवडाभरात 20 हजाराचे टार्गेट पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या. पदभार घेतल्याबरोबरच डीएचओ कुरवाड यांना मोठे काम लागले आहे. एक तरुण डीएचओ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. आरोग्य विभागात स्मार्ट वर्क झाले पाहिजे अशी अपेक्षा सीईओ जैन यांनी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन डॉ. कोपूरवाड यांनी डॉ. नवले यांच्याहस्ते पदभार स्वीकारला यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव उपस्थित होते.