सोलापूर : दहावी, बारावीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवा स्पार्क उन्हाळी शबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो. हातान कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दक्षिण सोलापूर आतील कुडल संगम येथे निसर्गाच्या सानिध्यात युवा स्पार्क उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना सहा प्रकारचे खेळ व मनोबल वाढविण्यासाठी व्याख्यानाचा लाभ घेता येणार आहे. शिबिर संयोजकाने माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना या शिबिराचे निमंत्रण दिले आहे. दहावी व बारावीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी या शिबिराचा चांगला उपयोग होईल असे मत शिक्षणाधिकारी जगताप यांनी व्यक्त केले आहे. पालकांनीही याबाबत सजग राहून आपल्या पाल्याला परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून अशा शिबिरांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध