सोलापूर : जिल्हा परिषदेने दिनांक पाच मे रोजी गट क व ड कर्मचाऱ्यांसाठी बदली कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तो रद्द करण्यात आला आहे. याचे कारण न देता नवीन बदली कार्यक्रम दिनांक ११ व १२ मे रोजी ठेवला आहे. यामध्ये आरोग्य सेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश केला गेला नाही. याचे कारण जिल्हा परिषदेच्यावतीने दिलेले नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांना निवेदन देऊन जिल्हा परिषदेमधील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करणेबाबत निवेदन देण्यात आले.
शासनाच्यावतीने जनगणनेच्या कामासाठी आदेश असणाऱ्या गट क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांना वगळण्याचे आदेश आहेत, परंतु ज्यांना आदेश नाहीत आणि दिव्यांग कर्मचारी, दुर्धर आजार असणारी कर्मचारी,वयाची 53 वर्ष पूर्ण असणारे कर्मचारी, हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करूनसुद्धा बदली प्रक्रिया न राबवल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. जिल्हा परिषदेकडून बदली प्रक्रिया राबविली जावी, असे निवेदन संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य यांना देण्यात आले. शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात येतील, असे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले.

More Stories
पंढरपूरची आरोग्याची वारी; सोलापूर झेडपीची नाही तयारी
नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात : सजवलेल्या बग्गीतून निघाली वधू – वरांची वरात
पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत नरेंद्र काळे मित्र परिवारतर्फे आज सामुदायिक विवाह सोहळा