पंढरपूर: वाखरी येथिल आयुष्यमान आरोग्य उपकेंद्रात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरडे, डॉ. सुडके, प्रा. आ. केंद्र गाडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगावणे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार हे उपस्थित होते. तसेच परिसरातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, वाखरी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी कोळी, वाखरी येथील सर्व आजी-माजी सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, आरोग्य कर्मचारी, पालक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांच्याहस्ते 5 वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहिमेस शुभेच्छा दिल्या व ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय मिळवू दरवेळी’ हा संदेश दिला.
जिल्ह्यातील 4,36,572 बालकांसाठी 6,513 लसीकरण बूथवर 7,222 कर्मचारी कार्यरत आहेत. 0 ते 5 वर्षांखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमास उपस्थित पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस पाजून मोहिमेत सहभाग नोंदवला.

More Stories
सोलापूर झेडपीची विमा सुरक्षा कवच योजना राज्यभर राबविणार
सोलापुरात विड्या वळत महिलांनी ऐकली “मन की बात’
पालकमंत्री गोरे यांच्याहस्ते मिळणार सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांना नव्या गाड्या