सोलापूर: पुणे महामार्गावर रविवार दि. ३१ मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अरण गावाच्याहद्दीत पेट्रोल पंपाजवळ पुण्यावरून सोलापूर येथे जात असलेल्या ट्रकने मोटारसायकलीस धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.
ट्रक क्रमांक MH 14 KQ 1006 हा वेगाने सोलापूर कडे निघाला होता. अरुण जवळ समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 45 J 1387 ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांनी मोडनिंब येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे फौजदार उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तुषार गणेश सावंत (रा. अरण ) असे आहे. या अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप