सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्याच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीच्यावतीने बुधवार दिनांक 10 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
शालार्थ आयडी व थकीत पगार काढण्यासाठी एका शिक्षिकेने माध्यमिक शिक्षणाधिकार्यावर आरोप करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्या शिक्षिके विरुद्ध सदर बझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. असे असताना त्या शिक्षिकेने झेडपीसमोर सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.या उपोषणास दलित पँथर संघटना महिला आघाडी सोलापूर जिल्हा यांच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत चांगल्या पद्धतीने काम करणारे, जबाबदार, कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहेत. संबंधित शिक्षिकेने दबावतंत्र टाकून बेकायदेशीरपणे शालार्थ आयडी मिळवला आहे. त्यानंतर आता थकीत वेतनासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. पण वस्तूचा प्रशासकीय मान्यता देवून त्यांचे थकीत वेतन मिळणेकरिता त्यांची शिफारस भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), सोलापूर मिळणेसाठी या कार्यालयाकडून प्रस्ताव शिफारस करून तो प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात दाखल केलेला आहे. त्यामुळे या कार्यालयाने पूर्णपणे काटेकोरपणे पालन करून जबाबदारी पूर्ण केली आहे. असे असताना ती शिक्षिका वारंवार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना टारगेट करीत आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय आहे. जिल्हा परिषदेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे दबाव टाकून विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे.
त्यामुळेच दलित पॅंथर महिला आघाडीच्या वतीने बुधवार दिनांक 10 जून रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या समर्थनार्थ पूनम गेट येथे सकाळी ११ वा. महिला मोर्चा काढणार आहोत, असा इशारा दलित पॅंथरच्या महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी गायकवाड यांनी दिला आहे.

More Stories
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी
राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेसाठी 15 जूनपासून प्रवेश प्रक्रिया