सोलापूर : आषाढीवारी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना ग्रामविकास व पंचायराज विभागाने पुरविलेल्या सुविधावर वारकरी खुश झाले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी धर्मपुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर संस्थानचे विश्वस्त यांचेसमवेत सुविधा व वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली. पालखी तळावर भेट देऊन सोहळा प्रमुख व वारकरी यांचेशी संवाद साधून त्यांनी वारकरी यांचे भावना जाणून घेतल्या. पावसात भिजत निघालेल्या वारकऱ्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व पावसापासून संरक्षण करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेनकोट भेट दिले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न करता पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर वारकरीसमवेत पायी चालत थेट कारूंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेतली. सोहळा प्रमुखांसमवेत जमिनीवर मांडी घालून प्रसाद घेतला. त्यानंतर सोहळा प्रमुख यांचे कार्यालयात सुविधांबाबत चर्चा केली. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संस्थानच्या वतीने महावस्त्र व प्रसाद देऊन स्वागत केले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य , माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, अभिनेता भाऊ कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांचा सोहळा प्रमुखांच्यावतीने स्वागत करणेत आले. यावेळी गटविकास अधिकारी पांढरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.
वारकरी यांचेसाठी रेनकोटचे वाटप
ग्रामविकास विभाग यांचेवतीने प्रातिनिधिक स्वरूपात रेनकोटचे वाटप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेहस्ते करणेत आले. या पालखी सोहळा प्रमुख यांना महावस्त्र व रेनकोट देऊन स्वागत केले. तसेच वारकरी यांनी देखील प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री यांचे हस्ते रेनकोटचे वाटप करणेत आले.
सोलापूर जिल्हा परिषदेने प्रमुख संताच्या पालखी मार्गावर ग्रामविकास व पंचायराज विभागाचेवतीने पुरविणेत येणारे विविध सुविधांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी सोहळा प्रमुखांना दिली.
पालखी मार्गावरील विविध सुविधांवर वारकरी खुश
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर राज्यातील इतर संताच्या एकुण दहा पालखी मार्गांवर ग्रामविकास विभागाचे वतीने शौचालय सुविधा, स्नानगृह, मसाज सुविधा , हिरकणी कक्ष , पिण्याचे पाणी, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष (जर्मन हॅंगर) मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाईल चार्जिंग सुविधा याबरोबर या सुविधा पुरविताना सहाय्यक म्हणून वारी दूत तैनात करणेत आले आहेत.
जलदूतांची सेवांवर वारकरी समाधानी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे संकल्पनेतून मुख्यमंत्री आरोग्यदूत, मुख्यमंत्री वारीदूत, मुख्यमंत्री जलदूतांची संकल्पना राबविणेत आली आहे. या सेवा देणारे कर्मचारी गणवेशात या सेवा पुरविणेत येत आहेत. विविध सेवा आपुलकीने विचारपूस करून देणेत येत आहेत. आरोग्यदूत मोटारसायकल वरून सेवा देत आहेत. जलसेवा देणेसाठी टॅंकर चालक यांचेसाठी उप अभियंता नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यकारी अभियंता संतोष काटकर, उप अभियंता रणजित काळे हे पुणे ते पंढरपूर या दोन्ही मार्गांवर नियंत्रण ठेवून आहेत.
आरोग्यदूतांची मोबाईल सेवेमुळे जागेवर सुविधा
सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आरोग्यदूत म्हणून मोबाईल सेवा देत आहेत. दोन आरोग्यदूत मोटारसायकलवर बसून वैद्यकीय किटसह वारकरी यांना जागेवर फिरून सुविधा देत आहेत. पायी चालणारे वारकरी यांना यामुळे जागेवर सुविधा देत आहेत. आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी स्वतः या सेवेची पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सतीश कोपूरवाड. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी घाडगे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिनेता यासाठी समन्वय ठेवून आहेत.
मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाउसफुल्ल
पालखी मार्गावर चालून चालून थकलेले भाविकांना विसावा मिळणे साठी ग्रामविकास व पंचायराज विंभागाने मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्राची सोय केली आहे. ऊन वारा पाऊस या या मुळे वारकरी बांधवांची मोठी सोय झाली आहे. या सुविधांकडे वारकरी खुश आहेत. थकलेले पायांना आराम मिळणेसाठी मसाज सुविधा केली आहे. वारकरी निवारा केंद्रात हजारो वारकरी आराम करीत आहेत. यात हिरकणी कक्ष व मसाज सुविधा देणेत आलेली आहे. जिल्हा परिषदेचे सिईओ कुशल जैन, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकात भुजबळ यांनी आज या सुविधांचीही पाहणी केली. शौचालय व सोहळा पुढे गेले नंतर मार्गातील साफसफाई करणेसाठी उपमुख्य कार्यकारी अमोल जाधव नियंत्रण करीत आहेत.

More Stories
सोलापूर जिल्हा परिषद पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश देशपांडे
अकलूज येथे नेत्रदीपक रिंगण सोहळा; हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावर पुष्पवृष्टी