सोलापूर : राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी रस्ता सुरक्षा बैठक दाखवून सुरु केलेल्या कौटुंबिक सदस्यांचा पर्यटन दौऱ्याची आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे परिवहन आयुक्त सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील नियोजित कार्यक्रमापेक्षा आरटीओ अधिकाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थेची घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे. भिमनवार यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पाहुणचार करताना परिवहन खात्यातील अधिकारी मेटाकुटीस आल्याचे चित्र विभागात दिसून येत आहे. आयुक्त भीमनवार यांची रेसिडेन्सी क्लब येथे बडदास्त ठेवण्यात आली आहे. शनिवारी रात्री 10 वाजता पोहचून आयुक्त मीटिंग घेणार म्हणून सर्व मोटार वाहन निरीक्षक हजर होते परंतू मीटिंग झालीच नाही. पण हॉटेल ओरिएंट क्राऊन येथे शाही भोजनाचा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालला. रविवारी सांगली येथे मीटिंग दाखवून आयुक्तांनी नातेवाईकांना नरसोबाची वाडी येथे रवाना करून मीटिंग आटोपती घेत स्वतः नरसोबाची वाडीत पोहोचले. त्यानंतर कोल्हापूर येथील कार्यालयात संध्याकाळी बैठकीचे नियोजन करण्यात आल्यामुळे सर्व निरीक्षक दोन दिवसांपासून वेठीस धरल्यामुळे वैतागले आहेत.या दौऱ्याचा आर्थिक भार निरीक्षकांना सोसावा लागणार आहे ते वेगळेच. मागील महिन्यात महाबळेश्वर येथे असाच दौरा पार पडला. महाबळेश्वर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लाखों रूपयांचा खर्चाबाबत निरीक्षक व वरिष्ठांमध्ये बिनसलेची चर्चा सुरू झाली असून कोल्हापूर येथे किती मोठे लक्षावधी उड्डाण घ्यावे लागतील यामुळे निरीक्षकमध्ये धाकधूक सुरू आहे.
मागील महिना अखेरीस राज्य भरातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाणे येथील हॉटेल टीपटॉप येथे आयुक्तांचे आदेशान्वये लाखोंची उड्डाणे घेत पार पडली.याचा मोठा फटका ठाणेकरांना पडल्याचे ऐकिवात आहे. फिल्म सिटीतून परिवहन विभागात बदलीवर आलेल्या आयुक्तांची ही जीवनशैली विभागाच्या चर्चेचा भाग झालेली आहे.यापूर्वी पंढरपूर येथेही आयुक्तांनी नातेवाईकांसह पंचतारांकित दर्शन घेतल्याचे पुढे येत असून सोलापूरकरानी त्यांची चांगली बडदास केल्याचे सांगण्यात येत आहे.