April 19, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात दसरा महोत्सवात या कलाकारांनी वेधले लक्ष

सोलापूर : सोलापुरात नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा झाला. मंगळवारी विजयादशमीनिमित्त  जुळे सोलापुरात आयोजित रावण दहन कार्यक्रमाला कर्नाटकातील कुडगी येथील कलाकारांनी  हजेरी लावून विविध सोंगामधून सर्वांचे लक्ष वेधले.

सोलापुरात नवरात्र मंडळांनी देवीच्या वाजत गाजत मिरवणुका काढून नवरात्र उत्सवाचा समारोप केला. यानिमित्त श्री रुपाभवानी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मिरवणुकांना प्रारंभ झाला.  मानाच्या पालखीचे पार्क चौकातील शमी वृक्षाजवळ आगमन होताच उपस्थित भाविकांनी सोने लुटले.  त्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध मंडळाच्या मिरवणुका निघाल्या. जुळे सोलापुरात विजयादशमीनिमित्त जुळे सोलापूर सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित रावण दहन कार्यक्रमात माजी आमदार दिलीप माने यांच्याहस्ते रावण दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला मिरवणूकीदारे भाविकांनी हजेरी लावली. या मिरवणुकीतील कर्नाटकातील कलाकारानी विविध वेषात सर्वांचे लक्ष वेधले. या मिरवणुकीतील गुरुनाथ हौशेट्टी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ…..