September 12, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुलीच्या शाळेला निधी देण्याची सूचना

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड मुलीच्या शाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी अचानक भेट देऊन बांधकाम व मुलांच्या गुणवत्तेची तपासणी केली.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी गुरुवारी अक्कलकोट दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मैंदर्गी येथील कन्नड मुलीच्या शाळेला अचानक धावती भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी शाळेतील स्वच्छतागृह,  स्वयंपाकगृह, वर्गखोल्या, संगणककक्ष, प्रयोगशाळा व मध्यान भोजनाचा स्वाद याचे निरीक्षण केले.  तसेच मुलींची गुणवत्ता व गणवेश याही गोष्टी त्यांनी लक्षपूर्वक निरीक्षण केल्या. यानंतर नवीन खोली बांधकामचे निरीक्षण केले. यावेळी अक्कलकोटचे बांधकाम विभागाचे उपाधियंता उषा भिडला व शाखा अभियंता रविशंकर बोधले उपस्थित होते.
मुलींचे स्वच्छतागृह निरीक्षण केल्यानंतर सोबत असलेले अक्कलकोट पंचायत समितीचे कार्यालय निरीक्षक  दयानंद परिचारक यांना गटविकास अधिकाऱ्यांकडून  मुलींचे स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी त्यांचे स्वागत केले व शाळेबाबत माहिती दिली.