सोलापूर: नरसिंग गिरजी चाळीच्यावतीने दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांच्या संकल्पनेतून एक पणती मराठा आरक्षणासाठी व एक पणती आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या उदंड आयुष्यासाठी ही संकल्पना घेऊन हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवामध्ये 1 हजार पणत्यांच्या ‘मराठा आरक्षण” अशी प्रतिकृती साकारण्यात आली. पण त्या प्रज्वलित करण्यासाठी सर्व जाती धर्मातील महिला व नागरिकांचा लक्षणीय सहभाग होता.

प्रारंभी या दीपोत्सवाचे उदघाटन सोलापूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मनपा परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मयूर खरात,जेष्ठ नागरिक अप्पासाहेब सलगर, लक्ष्मण जगताप, सामाजिक कार्यकर्त्या शशिकला कदम,दीनानाथ शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी चेतन नरोटे, पुरुषोत्तम बरडे, माऊली पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी या नावीन्यपूर्ण अशा उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे आरक्षणाचा लढा आणखीन मजबूत होईल. विशेष म्हणजे या उपक्रमात सर्व जातीय व सर्व धर्मीय सहभागी झाल्यामुळे अतिशय चांगला असा संदेश समाजामध्ये गेला असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. आज एकीकडे जातीय तणाव वाढवण्याचा काही शक्ती जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसून येतात,अशा उपक्रमामुळे जातीय सलोखा राखण्याचे काम होत आहे, असे कौतुक  पाहुण्यांनी व्यक्त केले, सोबतच मराठा समाजाला आरक्षणाची कशी नितांत गरज आहे व मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन निश्चितपणे यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी जरांगे पाटलांच्या उदंड आयुष्यसाठी प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी केले.
यावेळी प्रदीप सावंत, सूर्यकांत क्षीरसागर, शाहू सलगर, श्रीनिवास बोड्डू, कुमार गरड, बसवराज कोळी, गणराज तरुण मंडळाचे अध्यक्ष शैलेश कांबळे, भारत सलगर, विनायक घाडगे, पूजा भोसले ,अजय क्षीरसागर,नवनाथ भोसले, रघु वरकल, नागेश सोलनकर, संभाजी शितोळे, सुधीर कदम, अजय जाधव, मुकेश खांडेकर, गोपी खांडेकरयांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ साळुंखे, चंद्रकांत पात्रे, पिंटू माने, गणेश कोळी, महादेव गायकवाड, दीपेश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *