सोलापूर: जुळे सोलापुरातील शांती अपार्टमेन्टमधील आदेश गोडसे व मित्र परिवाराने पुण्यातील लोहगड किल्ल्याचे साकारलेले प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळी सुट्यांमध्ये शांती अपार्टमेंन्टमधील आदेश गोडसे व त्याच्या सहकारी मित्रांनी लोहगड किल्याची प्रतिकृती तयार केली आहे. सोशल मीडियावर या लोहगडची प्रतिकृती व्हायरल झाल्यावर हा किल्ला पाहण्यासाठी जुळे सोलापूरातील बहुसंख्य नागरीक, माहिला, मुले यांनी गर्दी केली आहे. या प्रतिकृतीसोबत अनेकांनी सेल्फी काढून आनंद व्यक्त केला तसेच आदेश गोडसे व त्याच्या सहकार्याला शुभेच्छा दिल्या. लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याची सर्व आयडिया आदेश गोडसे याची आहे. यासाठी त्यांने स्वतः लोहगड किल्ल्याला भेट दिली व परिसराचा अभ्यास करून ही प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांने सर्व साहित्य गोळा केले. त्यानंतर किल्ला बनवण्यासाठी त्याचे मित्र अकिल बिराजदार- पाटील,आदित्य गंभीरे,मल्लीकार्जुन पटणे, तीर्थ कल्याणशेट्टी, श्रीतेज देशपांडे,शार्वेन शास्त्री,आकाश पाटील,सुशांत पाटील, श्री बिज्जरगी, विरेश सुतार, सुशांत पाटील,लक्ष्मी पटणे, श्रावणी बिज्जरगी, चैत्रा शास्त्री,विभावरी गोडसे, स्वरा देशपांडे यांनी मदत केली.