सोलापूर : नागपुरात गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या 138व्या महांसंमेलनात राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या विराट सभेचे साक्षीदार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या समवेत होण्याची संधी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापूरे व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना मिळाली.

काँग्रेसचे 138 वे महासंमेलन गुरुवारी नागपुरात झाले या संमेलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एका बसद्वारे कार्यकर्त्यांना नेले होते. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे महासंमेलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. गुरुवारी दुपारी चार वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमवेत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना बसण्याची संधी मिळाली. यावेळी विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांची भाषणे झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचेही प्रभावी भाषण झाले,  अशी प्रतिक्रिया सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *