सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत टीकेचे लक्ष ठरलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात सन्नाटा पसरला आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या कारभाराचा पाढा वाचण्यात आला. यामध्ये सर्वच आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. माजी आरोग्यमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख यांनी तर डीएचओ बदला अशीच मागणी केली. त्यामुळे आरोग्य विभागावर वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य पातळीवरून या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा नियोजनच्या सभेनंतर शुक्रवारी जिल्हा आरोग्य विभागात सन्नाटा पसरला होता. बरेच कर्मचारी गायब होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले तर कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत अशी स्थिती दिसून आली. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या कारभारात सुधारणा होणार का? हा प्रश्न आधांतरीच दिसून येत आहे. आमदार विजयकुमार देशमुख सहसा कोणाविरुद्ध कधी तक्रार करीत नाहीत, पण जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आरोग्य विभागावर ते का संतापले? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध