सोलापूर
मंद्रूप तहसीलमधील दोन तलाठ्यांना पदोन्नती
-
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या दोन तलाठ्यांना मंडल अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नती मिळालेल्या तलाठ्यांचा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- विंचूरचे तलाठी सूर्यकांत जोडमोटे हे पदोन्नतीने नागणसूरचे मंडलाधकारी झाले आहेत तर टाकळीचे तलाठी प्रदीप जाधव हे पदोन्नतीने दुधनीचे मंडलाधिकारी झाले आहेत. तसेच मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक कसबे यांची माढा तहसील कार्यालयात अव्वल कारकूनपदी पदोन्नती झाली आहे. या तिघांचा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सन्मान केला. या तिघांनी आपल्या कार्यालयात येणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांची चांगली सेवा केल्यामुळे पदोन्नतीचे फळ मिळाले आहे. त्यांनी हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे अशा शुभेच्छा लिंबारे यांनी दिल्या. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंडल अधिकारी ज्योतिबा पवार, महादेव स्वामी, रावसाहेब कोकरे उपस्थित होते.