सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी चादर, जॅकेट आणि गारमेंट उद्योगाचे कौतुक केले आहे.
रे नगरच्या घरकुल लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात आले आहेत. कुंभारी येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी चादर, जॅकेट आणि गारमेंट उद्योगाचा उल्लेख केला. रे नगरमध्ये ज्यांना घरकुल मिळाले, त्यांचे अभिनंदन करून ‘भारत माता की जय” असा जयजयकार केला. सोलापुरातील लघुउद्योजकांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे त्यांनी आवाहन केले. बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी मोदी यांचे भाषण संपले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्यात श्रीराम मंदिर उभारणीचे काम पूर्ण केल्याबद्दल सोलापूरवाशीअंतर्फे त्यांना श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती भेट देण्यात आली. रे नगरतर्फे माजी आमदार नरसया मॅडम यांनी मोदी यांचा सन्मान केला. कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटककडे रवाना झाले आहेत.
मराठीतून नमस्कार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात करताना मराठीतून पंढरपूरचे विठ्ठल व सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांना नमस्कार केला. त्यानंतर 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या ऐतिहसिक क्षणाची आठवण करून दिली. निवडणुकीपूर्वी आम्ही जी वचने दिली आहेत ती पूर्ण करीत आहोत, असा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
मैने उसे डाटा भी…
सोलापुरातील चादरी व गारमेंट उद्योगाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अंगातील जॅकेटकडे हात करून म्हणाले की ‘ये जो मैने जॅकेट पहना है, वो जॅकेट सोलापूरमेकाही मेरा चाहता भेजता है. मैने उसे मना करने पर भी उसने मुझे जॅकेट भेजा. तो मैने फोन कर उसे डाटा भी, फिर भी वो मुझे जॅकेट भेजता है, असे म्हणतात सभेत समोर बसलेले बीवाय टेलरचे किरण येज्या यांनी हात उंचावताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या.