
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील हे जालन्यावरून निघाले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारो मराठे एकत्र आले व तेथून छत्रपती संभाजी महाराज चौकांमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठ्या मराठा समाजाला नुसता पाठिंबा जाहीर न करता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान व त्यांचे सहकारी या मोर्चात सामील झाले आहेत तर एमआयएम पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष फारुक शाब्दी व त्यांचे पदाधिकारी व सहकारी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईकडे निघालेल्या या सर्व मराठा योध्याचा पहिला मुक्काम माढा तालुक्यातील अरण येथे होणार असून उद्या सकाळी पुढील वाटचालीस सुरुवात होणार आहे. हजारोच्या संख्येने निघालेला मराठा समाज हा पुढे लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचेल जिल्ह्यामधून मोहोळ, पंढरपूर, माढा ,करमाळा ,मंगळवेढा या सर्व तालुक्यातून व शहरातून मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. या आरक्षण मोर्चामध्ये रवी मोहिते, माऊली पवार ,राजन जाधव ,पुरुषोत्तम बरडे,अमोल शिंदे, आनंद जाधव, नागेश ताकमोगे ,बालाजी वानकर, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे मतीन बागवान, श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे, विजय पोखरकर , दत्तात्रय मुळे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पोपट भोसले ,महेश घाडगे, निशिकांत वाबळे, कृष्णा जगदाळे, राजाभाऊ गवळी, विकास कदम, संतोष गरड ,सुनील शेळके, हेमंत पिंगळे, प्रशांत देशमुख, बाळासाहेब ताकमोगे ,सचिन साळुंखे, जी.के .देशमुख, अविनाश गोडसे, रविकांत भोपळे ,राम साठे, उदय पाटील, महादेव गवळी, बाळासाहेब गायकवाड, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे,आदेश गोडसे यांच्यासह हजार रुपये मराठा बांधव सहभागी झाले आहेत. मोर्चामध्ये वाहनांचा मोठा ताप आहे वाटेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. मोहोळमध्ये बाळराजे पाटील यांची उपस्थिती होती.
खंडोबा मंदिरात महाआरती…
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चाची तातडीची बैठक झाली. मनोज जरांगे पाटिल यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात उद्या रविवारी सकाळी 11 वाजता महाआरती करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. 26 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे हा मोर्चा धडकणार आहे. या बैठकीत सोलापूर शहर जिल्ह्यातील संबंध मराठा समाज मुंबईकडे रवाना होणाऱ्या बांधवांची सोय व्हावी यासाठी नियोजन करण्यात आले. मनोज जरांगे पाटिल यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, त्याना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात उद्या रविवारी सकाळी 11 वाजता महाआरती ठेवण्यात आली आहे. तरी सबंध मराठा बांधवांनी आरतीस उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके यांनी केले आहे.
या बैठकीस दास शेळके, सुनिल रसाळे, राजाभाऊ कुसेकर, शेखर फंड, प्रशांत बाबर, निलेश शिंदे, सुनिल हुंबे, अक्षय शिंदे, सचिन गोडसे, संजय घाडगे, संभाजी शितोळे, निरंजन नवघिरे यांच्यासह युवक उपस्थित होते.