सोलापूर : जिल्हा परिषदेत नेहमी दिसणारे ‘ते” दोन टोपीवाले अडचणीत आले आहेत. एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह त्यांच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे व जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव या दोघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ही घटना घडली आहे. पीडित महिला गावात बाजार करून वस्तीकडे जात असताना मोटारसायकलवर आलेल्या या दोघांनी ग्रामसभेत लय आवाज करते का म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार कामती पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तपासावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामती पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याचेही समजते आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध