सोलापूर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये एक नवीन हालचाल सुरू झाली आहे. साडेआठ वर्षानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक ‘एक” ची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी जिल्ह्यातील 29 पतसंस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या निवडणुकीचा समावेश आहे या पतसंस्थेची यापूर्वीची निवडणूक एप्रिल 2015 मध्ये झाली होती कोरोना महामारीमुळे विद्यमान संचालकांना सुमारे साडेतीन वर्षे मुदत वाढ मिळाली आहे आता मात्र जिल्हा उपनिबंधक यांनी पतसंस्थांचा निवडणुका कार्यक्रम जाहीर केला आहे यामध्ये 25 जानेवारी रोजी पतसंस्थेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर दोन फेब्रुवारीपर्यंत हरकती घेण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सात फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे आणि 13 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर मतदान प्रक्रियेला  सुरूवात होणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एक ही सर्वात जुनी पतसंस्था आहे. आज मितीला  या पतसंस्थेचे 1315 सभासद असून मतदानास 922 जण पात्र असल्याचे सांगण्यात आले. या संस्थेचे भाग भांडवल 16 कोटी 6 लाख असून बचत ठेव 6 कोटी 64 लाख इतकी आहे.  संस्थेचा रिझर्व फंड 2 कोटी 94 लाख तर संस्थेला गत वर्षात एक कोटी दहा लाखाचा नफा झाला आहे. संस्थेने पाच टक्के लाभांश वाटपही केले आहे. संस्थेचे कर्ज वाटप 24 कोटी 54 लाख इतके असून गुंतवणूक 1 कोटी 52 लाखाची आहे. संस्थेला ‘अ” वर्ग असून स्वमालकीची 1 कोटीची सुसज्ज इमारत व विश्रामगृह आहे. त्यामुळे संस्थेच्या निवडणुकीत चुरस असते या वेळेस कोणाकोणाचे पॅनल निवडणुकीत उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यादृष्टीने आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाल्याने ही निवडणूक लक्षवेधी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *