March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी वाय. पी. कांबळे

सोलापूर :: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनाची राज्यस्तरीय बैठक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली.

यावेळी राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपूर उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते राज्य उपाध्यक्ष वाय. पी. कांबळे यांची निवड करण्यात आली तर राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून रफिक शेख यांची निवड करण्यात आली.  गेले अठरा वर्ष वाय. पी. कांबळे हे सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष म्हणून धडाडीने कामकाज केलेले आहे. ते राज्यस्तरावर गेल्याने त्यांच्या रिक्त पदावर सोलापूर शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी समीर शेख व कार्याध्यक्षपदी संजय उपरे व जिल्हा सचिवपदी काशिनाथ गाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, काशिनाथ बिराजदार ,संतोष मंडलिक, चंद्रकांत पवार, विष्णू सानेपागुल, केदार गायकवाड, इफ्तिकार चाऊस , कलासागर घंटे श्रीमती पुष्पा साबळे, तुळसा चौगुले व बहुसंख्य जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व महिला आरोग्य कर्मचारी उपस्थित होते