February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शिवगीतांच्या भारदस्त सादरीकरणाने सोलापूर झेडपीत शिवजयंती साजरी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उदयानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचेहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले तर
मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद शाखेच्या वतीने यशवंतराव सभागृहात शाहिरांच्या मर्दानी शिवगीतांनी अंगावर शहारे आणले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा दिलेल्या घोषणामुळे सभागृह दणाणून गेले.

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्यावतीने रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ येथील रूपेश क्षीरसागर, किरणकुमारी गायकवाड, एकनाथ कुंभार, महेश म्हेत्रे, परवेझ शेख, राजाराम बाबर यांनी शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, महिला बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, उपशिक्षणाधिकारी नाळे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मराठा सेवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ जी.के.देशमुख, दत्ता मुळे, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष सदाशिव पवार, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, वाय. पी. कांबळे, दिनेश बनसोडे, विवेक लिंगराज, गिरीष जाधव, समीर शेख, योगेश हब्बु, चंद्रकांत होळकर उपस्थित होते. यावेळी स्वानंद टीचर च्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळी गीते सादर करून स्फुल्लिंग चेतले. सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आल्यामुळे वातावरण निर्मिती झाली. जय शिवाजी जय भवानी अशा घोषणाने वातावरण दुमदुमून गेले.

शिवरायांचे विचार आत्मसात करा

शिवरायांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. आपल्या आचरणांने व विचारांने महाराष्ट्र सक्षम ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे मत सीईओ आव्हाळे यांनी यावेळी मांडले. सीईओ मनिषा आव्हाळे या आजारी असतानाही शिवजयंती सोहळ्यास उपस्थित राहून सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साह वाढविला. शिवगीत गाणारे कलाकार याची सन्मान करून त्यांना प्रेरणा दिली. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी यावेळी देशभक्तीपर गीत सादर केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आभार व्यक्त करताना शिवजयंतीच्या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावल्याचे नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन वाघमारे, आदम मन्सुर नाईक,सचिन चव्हाण, अनिल जगताप, म.ज. मोरे, सचिन साळुंखे, राम जगदाळे, अजीत देशमुख सचिन चवरे, सुधाकर माने देशमुख, नितीन चेतन भोसले, विशाल घोगरे, रोहीत घुले, अनिल पाटील, संजय चव्हाण, सचिन पवार, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, भूषण काळे, विठ्ठल मलपे, संतोष शिंदे, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, रणजीत गव्हाणे,गणेश साळुंखे, महेंद्र माने, उमेश खंडागळे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, आनंद साठे, जयवंत जाधव, संतोष नीळ, अशोक मोरे, प्रकाश शेंडगे, अभिजीत निचळ , देशमुख, राजाराम रणवरे, गिरीष धुमाळ, सुनिता भुसारे, अश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, ज्योत्स्ना साठे, भारती धुमाळ, सविता मिसाळ अर्चना निराळी, अनिता तुपारे, छाया क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. प्रास्तविक मराठा सेवा संघाचे जि. प. शाखेचे जिल्हाधक्ष अनिनाश गोडसे यांनी केले.