सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या  भिमनगर येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 एप्रिल 1937 रोजी रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास बुडवून ज्या भैया ऐतिहासिक विहिरीचे उद्घाटन केले होते .या ऐतिहासिक विहीर परिसर सुशोभीकरण व स्मारक बांधकामाच्या शुभारंभची तारीख दोन मार्च ही निश्चित करण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे  माजी गटनेते आनंद ( चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती 2022- 23 या कालावधीमध्ये या वळसंग ऐतिहासिक विहीर परिसर सुशोभीकरण स्तुप व स्मारक बांधकाम करण्यासाठी 72 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मोजे वळसंग ऐतिहासिक विहीर सुशोभीकरण स्तूप व स्मारक भूमिपूजन बांधकाम शुभारंभ कार्यक्रम निश्चित करण्यासाठी शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी वळसंग ऐतिहासिक विहीर भीमनगर येथे नियोजन बैठक आनंद चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंता राजेश जगताप उपस्थिती होते.यावेळी ऐतिहासिक विहीर सुशोभीकरण स्तूप व स्मारक बांधकाम शुभारंभ कार्यक्रम दि.2 मार्च  रोजी दु.4 वा. वळसंग ऐतिहासिक विहीर भीमनगर येथे निश्चित करण्यात आला आहे.

यावेळी दीपक गायकवाड, सलगरचे उपसरपंच अमोल फुटगे, बऱ्हाणपूरचे उपसरपंच दीपक बनसोडे,बॅगेहळीचे उपसरपंच विजय गायकवाड, आचेगावचे उपसरपंच बलवान गोतसुर्वे ,कुंभारीचे सदस्य महेश सिकंबे, वळसंगचे सदस्य मेजर आनंद गायकवाड, वळसंग ग्रामसदस्य सिद्राम वाघमारे, अक्षय कुमार, शांतीकुमार गायकवाड, कुमठेचे सदस्य अविनाश गायकवाड, उद्योगपती संदेश इंगळे, कर्देहळीचे सरपंच नागेश शिंदे, लिंबी चिंचोली सदस्य मधुकर दिलपाक, भारत शिंदे, कुमार वाघमारे, वळसंग, अनिल बर्वे, श्रीमंत जाधव,अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, भीमा मस्के ,जयराज सांगे, जादु दुपारगुडे आदी भीमसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *