सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण
सांगोल्यात कॉपी करताना विद्यार्थिनी सापडली
दहावीच्या इंग्रजी पेपरला 1031 विद्यार्थ्यांची दांडी

सोलापूर : दहावीच्या इंग्रजी पेपरच्यावेळी कॉपी करताना सांगोला तालुका केंद्रावर एका विद्यार्थिनीला पकडण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिक्षण व महसूल विभागाची पथके तैनात केली आहेत. गुरुवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे भरारी पथकामार्फत विविध
केंद्रावर अचानकपणे तपासणी करण्यात आली. यात सांगोला तालुका केंद्रावर एक विद्यार्थिनी कॉपी करताना आढळली आहे असे शिक्षण विभागाने कळवले आहे.