सोलापूर : ‘एकच फाइट वातावरण टाइट” फेम असलेले महानगरपालिकेतील माजी गटनेते व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी गुरुवारी दुपारी अचानक झेडपीत हजेरी लावल्यामुळे चर्चेचा विषय झाला. पण त्यांची ही धावती भेट ‘खोक्या”साठी होती, असे कळताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आंदोलन गेटच्या बाजूला असलेल्या टपऱ्या हटविण्यास सुरुवात केली. यामुळे टपरीधारकांची गर्दी झाली होती. महानगरपालिकेने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना प्रचंड पोलीस बंदोबस्त आणला होता. त्यामुळे झेडपीच्या प्रवेशद्वाराशेजारील टपऱ्यावर जेसीबीचा हातोडा पडला. ही माहिती मिळताच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे येथे आले. टपरीधारकांनी त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आल्यावर नरोटे यांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. परंतु सीईओ आव्हाळे यावेळी कार्यालयात नव्हत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे विचारपूस करून नरोटे आल्या पावली परतले. पण अचानक काँग्रेसचे पदाधिकारी झेडपीत आल्यामुळे चर्चेचा विषय झाला. अधिकाऱ्यांची धावपळ झाली. चेतनभाऊ कशासाठी आले होते? असे जो तो विचारू लागला. त्यावेळी एकाने मिस्कीलपणे उत्तर दिले ते ‘खोक्या”साठी आले होते.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध