
सोलापूर : शहरातील रेशन दुकानांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. शासनस्तरावरूनच प्रत्येक परिमंडळातील दहा दुकानाची अचानकपणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोलापूर शहरातील रेशन दुकानातील शिल्लक मालाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पास मशीनवर वितरित झालेला माल व दुकानात शिल्लक असलेला साठा यांचा हिशोब जुळतो का? हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापुरातील चार परिमंडळातील रेशन दुकानांचे अचानकपणे तपासणी करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तपासणी पास मशीनवर नोंद असलेला माल व दुकानात शिल्लक असलेला साठा यांच्या तफावत आढळल्यास रेशन दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.